पप्पा तुम्हाला आठवतोय का तुम्ही पप्पा झालात तो क्षण
मला वाटतं खुप सुंदर असणार तो क्षण
आपल्या पिल्लांना द्यायचयं सुंदर आयुष्य
त्यांच्या पंखात भरायचयं बळ आणि कायम समजुन घ्यायचयं त्यांचं मन
हे ठरवलं तो क्षण
पप्पा तुम्हाला आठवतोय का तुम्ही पप्पा झालात तो क्षण
तुमच्यां डोळ्यांनी जगाची खरी ओळख करून दिलीत
आणि खुप खुप माया केलीत आम्हा पिल्लांवर
तुमच्या उबदार कवेत आम्हाला सामावुन घेतलतं तो क्षण
पप्पा तुम्हाला आठवतोय का तुम्ही पप्पा झालात तो क्षण
आमच्यासाठी बाटा शुज तेव्हा तुम्ही घेतले साधे स्लिपर
आमच्यासाठी नवीन कपडे तुमचे मात्र जुनेचं स्वेटर
स्वतःसाठी पुरे आता , फक्त पोरांसाठी जगणे हे ठरवलं तो क्षण
पप्पा तुम्हाला आठवतोय का तुम्ही पप्पा झालात तो क्षण
आयुष्यभर तुमची धडपड आपुल्या या घरासाठी
तडजोडी त्या किती केल्या या घरट्यासाठी
आम्हाला लक्षात आहे आणि राहतील हे कष्ट
पण ह्या कष्टांच मोजमाप करायचं नाही हे ठरवलत तो क्षण
पप्पा तुम्हाला आठवतोय का तुम्ही पप्पा झालात तो क्षण
खात्री देतो तुम्हाला कधीचं नाही विसरणार तुमचे संस्कार
स्वतःसाठी जगा आता आम्ही होऊ तुमचे बाप
विसरलित तुम्ही चालेल पण आम्ही नाही विसरणार
त्या क्षणाचे रूण इतुके आम्ही कसे फेडणार
आम्ही कसे फेडणार
No comments:
Post a Comment