Tuesday, 30 August 2016

मी आणि रस्त्यावरचे प्राणी

'मी आणि रस्त्यावरचे प्राणी ' हे नाव वाचून तुम्हाला वाटलं असेल आता हा काही लिहायचा विषय आहे का??..किंवा ,"शी बाई हे काय आता प्राण्यांवर वाचायचं " किंवा अजून काही, मलाही अस काहीतरी लिहावं किंवा सांगावं असं आधी वाटतंच  नव्हतं पण रस्त्यावरच्या प्राण्यांनी 'मुझे मजबूर कर दिया' . काही वर्षांपूर्वी मी नवीन गाडी घेतली आणि त्या गाडीला धूम बाईक समजून मी तिला ३० च्या स्पीडने नाशिक च्या रस्त्यांवर पळवत असे. अर्थात माझ्या ह्या स्पीड मुळे मैत्रिणी माझ्या गाडीला 'बैलगाडी ' म्हणत हि गोष्ट वेगळी. तर अशा रस्त्यावरून जातांना  , रस्त्यावर फेरफटका मारायला आलेल्या अनेक प्राण्यांनसोबतचे हे किस्से.
                 गाडी अगदी नवीन घेतली होती ,मग गाडी वर फिरून हवा करण्यासाठी मी आणि माझी एक मामेबहीण आम्ही गाडीवर चक्कर मारायला जायचं ठरवलं. तिलाही गाडी चालवण्याचा उत्साह होता आणि मलाही , मग शेवटी विचारांती  आम्ही असा निर्णय घेतला कि जाताना तिने गाडी चालवायची आणि येतांना  मी . अशा पद्द्धतीने मस्त पैकी गॉगल वैगरे लावून , इतर गाडीवर इतके दिवस मुली कशा रुमाल बांधता ते आम्ही शिकून घेतलंच  होत तसा  रुमाल बांधून मस्तपैकी आम्ही गाडी स्टार्ट करून निघालो. आनंदी आनंद गडे असं  आम्हाला जिकडे तिकडे चोहीकडे पाहून वाटत होतं. मस्त धूम धूम ओरडत आम्ही चाललो होतो इतक्यात आमचा आनंद कोपऱ्यात बसलेल्या कुत्र्याला सहन झाला नाही.. त्याच्याकडे असाही काही टाईमपास नसावा बहुदा किंवा आमच्या रुमाल बांधण्यामुळे त्याला आम्ही कदाचित आतंकवादी वाटलो असावे म्हणून सुजाण नागरिकांप्रमाणे (सॉरी कुत्र्याप्रमाणे ) तो आमच्या गाडीमागे पाळायला लागला सोबतचं  भुंकायलाही लागला. अशी परिस्थिती येईल अशी आम्ही कल्पनांचं केली नव्हती ... तो कुत्रा आमच्यामागे जोरात पळू लागला ... इतका कि आता त्याच तोंड माझ्या पायापाशी आलं ..मी जोरात ओरडायला लागली ," राणी गाडीचा स्पीड वाढव  ते चावेल मला... पळ जोरात " , तिनेही स्पीड वाढवला पण तरी ते कुत्रा माझा पाय धरणार असा मला वाटलं आणि त्याच क्षणी मी माझे योगा स्किल्स वापरला म्हणजे श्वास आता घेतला आणि पाय सरळ रेषेत उचलला आणि सरळ हॅन्डल जवळ आणला ( please  dont  imagine  ) ..रस्त्यावरचे एक मुलगा ओरडला ,"थांबून घ्या काही नाही करणार पुढे गाडीला धडकाल " ...आणि तशीच योगा  पोझ मध्ये, गाडी चालू असतांना  मी त्याच्यावर ओरडले , " अरे त्या कुत्र्याला हाकल ना" .. बिचारा पटकन पुढे पळत पळत येत त्याने त्या कुत्र्याला हाकलला आणि मग आम्ही पुढे जाऊन थांबलो... तो पुढे आमच्या समोरून गेला तरीही मी इतकी घाबरली होती कि त्या मुलाला साधं " थँक यु " पण नाही म्हंटल. येताना मात्र आम्ही गाडी फार लांबून आणली आणि माझ्यामते तेव्हापासूनच गाडी ३० वर चालवायची हा निर्णय मी घेतला...म्हणजे जर कधी कुत्रा मागे लागलंच  तर गाडी पटकन थांबवून , तिथेच उतरून पळून जण सोप्पं राहील.

असाच एकेदिवशी पुन्हा गाडीवर  जात असताना एक कुत्रा रस्त्याच्या मधोमध उभा होता. मनात परत धडधड सुरु झाली कि आता हा कुत्रापण मागे लागणार.पण गाडी जवळ आली तेव्हा ह्या कुत्र्याने माझ्याकडे बघितलं आणि आमची नजरानजर झाली. खरंच त्याच्या डोळ्यात राग नव्हता नुकतंच  breakup झाल्यासारखं त्याचा चेहरा पडलेला होता. माझ्याकडे पाहिलं आणि परत खाली मन घालून तो रस्त्यावरून बाजूला जाऊन उभा राहिला. आज रात्री बहुतेक ९०-९० घेणार तो अस नक्कीच वाटलं. मग माझ्या मनात आलं कि खरंच हे प्राणी मनातल्या मनात विचार करू शकत असतील का? म्हणजे त्यांना माहित असेल का कि आपण त्यांना कुत्रा म्हणतो किंवा अजून पुढे जाऊन एखाद्या माणसाला म्हंटल ए कुत्र्या तर किती राग येतो तसं एखाद्या कुत्र्याला ए कुत्र्या म्हंटल तर राग येईल का कि तो फक्त काय रे माणसा असं  म्हणून मागे वळेल. माहित नाही पण प्राण्यांना पाहून मला अस वाटत कि ते विचार करत असतील  आणि एकमेकांशी बोलत असतील. म्हणजे आता त्यादिवशीचीच गम्मत ऐका , त्यादिवशी नेहमीप्रमाणे गायी बैल रस्त्याच्या मधोमध रवंथ करत उभे होते त्यांना कसबसं चुकवून पुढे आली तर रस्त्यावर दोन वासरे उभी होती आणि तिथून जाणं  पण शक्य नव्हतं  मग मी हॉर्न वाजवला तर रस्त्याच्या बाजूला असलेली गाय (त्यांची आई असावी असा मी आपला अंदाज बांधला) हंबरली तसे ती दोन्ही वासरे एकमेकांना ढकलत ढकलत त्यांच्या आई जवळ गेली आणि मला जायला जागा मिळाली. आता मी विचार केला हे जर एकमेकांशी बोलत असतील तर तो सवांद कसा असेल तो असा असेल का
वासरू नंबर १ - अरे बघ समोरून गाडी वर एक मुलगी येतेय आपण बाजूला होऊ
वासरू नंबर २ - आबे यार तू जॅम भित्रा आहेस ती पोरगी पहिली का आणि तिची गाडी पण बघ सगळं वजन मिळून आपल्या निम्म असेल  , थांब आपण तिला घाबरवू
वासरू नंबर १ - अरे नको ना यार , ते बघ आई समोरचं  उभी आहे बघितलं तर ओरडेल
वासरू नंबर २ - च्यायला काल तू एवढी 'माउंटन ड्यू ' ची बाटली चावून चावून फार तिची पट्टी करून टाकली पण त्याचा काही उपयोग नाही झाला
हॉर्न चा आवाज ऐकून गायआईने रस्त्याकडे पाहिलं
गायआई - (मनात काय हि पोर नुसता आगाऊपणा करता, नाही सांगितलं तरी त्यांना रस्त्यावरच उंडायचं असतं यंदा दहावीचं वर्ष आहे अभ्यास करायचा तर टाईमपास करताय)
              ए ढवळ्या, ए पवळ्या  अरे कशाला असें  रस्त्यात उभे आहात जाऊ द्या त्या पोरीला घाबरल ना ती , व्हा बाजूला
वासरू नंबर १ - चल रे म्हंटल होत ना मी आई ओरडेल चल पटकन
वासरू नंबर २- अरे हो रे भित्र्या बघ ती पोरगी बघ कशी थांबली आपल्यासाठी, आपुन बॉस है इधरका..
वासरू नंबर १ - असू दे चल अता आईचे बोलणे खा


 आमच्या 'तारवाला  नगराच्या , स्वच्छ भागात काही दिवसांपासून इकडे तिकडे 'फॅड्री ' (डुक्कर म्हणणं चांगल नाही वाटत हो बिचारे ) फिरू लागले होते एकटे दुकटे,  कळपाने आणि कधी कधी माता आणि तिच्यामागे तिची छोटी छोटी ७ ८ पिल्ले असे ते रस्त्यावरून मधेच इकडून तिकडे पळत असे. तर परत एकदा माझी स्वारी गाडीवरून निघाली होती आणि तितंक्क्यात मधूनच एक 'फॅड्री ' झुडपातून बाहेर आला आणि तो रोड  क्रॉस करणार तर मी आली तर परत तो मागे झाला आणि थोडं पुढे जाऊन मग क्रॉस करण्यासाठी सारखी पोसिशन घेऊ लागला तो धड क्रॉसही  करत नव्हता ना थांबत होता ना खूप पुढे जात होता . मी थांबली कि तोही थांबायचा  मी गाडी रस केली कि तोही पुढे जायचा आणि एकतर कुत्र्यासारखा तो वर मान करून बघूही शकत नाही ( कदाचित प्राण्यांमधल्या समाजव्यवस्थेमुळे तो कधीचं मान वर करून बघू शकत नसावा ) पण त्यामुळे मी मात्र फार संभ्रमात पडली . मग मी गाडी थांबवली , गाडी बंद केली आणि म्हंटल जा बाबा तुला कुठे जायचं तिथे पण तो मात्र तिथंच  उभा राहिला मन खाली घालून , आता मात्र प्रश्न पडला . मग मी गाडी स्टार्ट केली तशी त्याने रास्ता क्रॉस करायची पोसिशन घेतली मग मी फक्त ब्रेक दाबून जोरात गाडी रेस केली तसा तो जोरात पळाला आणि त्याने finally  रोड क्रॉस केला आणि मग मी आपली ऑफिस ला रवाना झाली . तेंव्हा  मला कळलं मी प्राण्यांना पण वेड्यात काढू शकते.

तर हे असे प्रसंग आले माझ्यासोबत आता कधी कोणासोबत काय प्रसंग येतील काही सांगू शकतो का आपण  ; पण आपण एक करू शकतो आलेलय प्रसंगातही विनोद शोधून थोडंसं  हसून घेऊ शकतो बाकी काय  .......




No comments:

Post a Comment