२७ एप्रिल २०१५ रोजी माझ लग्न होत आणि लग्नाच्या बरोबर दहा दिवस आधी म्हणजे १७ एप्रिल ला माझा accident झाला आणि हळदीच्या आधी प्लास्टर चढलं .ते प्लास्टर फक्त लग्नाचे दोन दिवस काढाल आणि पुन्हा हातावर विराजमान झालं .
असंच त्यादिवशी लग्नानंतर गावात मी काही कामानिम्मित एकटीचं निघाली. गावात असाच इकडे तिकडे भटकत असतांना समोरून एक मावशी स्मित हास्य करत माझ्याकडे चालत येतांना मला दिसल्या. साधारण ४० - ४५ वर्षाच्या त्या मावशीनी साडी अगदी स्वतःभोवती गुंडाळून घेतली होती.त्या माझ्याकडेच येताना पाहून माझ्या शरीरातले सगळे अणू - रेणू त्या चेहऱ्याची ओळख शोधु लागले , सगळा database check करून "Information Not Found " असा अलार्म बुद्धीने दिला आणि आणि मग मनाने विचार केला की अरे ह्या मावशी कदाचित आपल्या सासरकडून नातेवाईक असतील त्यामुळे मग मी अधिकच प्रेम ओतत त्यांना छानशी 'Smile ' दिली .
"अगं , काय कसं लागलं तुला ??", माझ्या प्लास्टरवाल्या हाताकडे पाहत मावशींनी विचारलं .
"काही नाही लग्नाआधी accident झाला" इति मी.
"हो का ? कसं झालं ?"
"काही नाही divider च्या इथे गाडीने ठोकलं "
"अगं बाई खूप दुखत असेल न प्लास्टर ??"
"नाही हो एवढ काही नाही "
"कसे करते सगळी काम मग ?"
"होतात आहो लक्ष दिलं कि दुखत त्यामुळे मी दुर्लक्ष करते आणि असाही आता एकचं महिना अजून सहन करायचं "
"खरय बरोबर बोललीस "
आता मात्र मला हा सस्पेंस सहन होईना मी विचार केला आपल्याला काही आगापिछा माहित नाही मावशींचा चेहराही आठवत नाही आता बोलावं तरी काय म्हणून मी चेहऱ्यावर पुन्हा एकदा प्रेमळ भाव आणत अतिशय नम्रतेने मावशीनं म्हंटल,
"माफ करा हं मावशी मला तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय; पण कोन आहे ते आठवत नाहीये (हि आपाली माझी सवय आहे , म्हणजे मला समोरच्याचा चेहरा आठवत नसेल तरी मी असंच म्हणते , मग समोरच्याला मी अगदीच विसरलीये असा वाटत नाही)
माझ्या ह्या प्रश्नावर मावशी हसल्या आणि हळूच त्यांनी हातावर गुंडाळलेला पदर बाजूला केला आणि ते पाहून मला हसावं कि रडावं कळेना. मावशींच्या हातालाही माझ्यासारखंच प्लास्टर होत. त्या म्हणाल्या,
"आठवणार कसं , आपण भेटलोच नाहीये, अगं तुझ्या हाताला प्लास्टर दिसलं म्हणून म्हंटलं विचारवं . माझापण मागच्या आठवडयात accident झाला. माझ्याकडूनच गाडी आवरली नाही आणि पडली मी जोरात. खूप दुखतंय माझं हे प्लास्टर. अजून एक महिना ठेवायचं कंटाळा आला होता . तू समदुःखी दिसली बघ , अगं प्लास्टर नसणार्यांना काय कळणार प्लास्टर घेऊन मिरवायची व्यथा. जाऊ दे बऱ वाटलं तुझ्याशी बोलुन, चल येते मी"
मावशी गेल्या आणि मी त्यांच्याकडे बघतच राहिली अगदी आ-वासून. आजकालच्या पळापळीच्या जीवनात त्या थांबल्या आणि माझ्याशी दोन शब्द बोलल्या कदाचित घरातली सगळी जबाबदारी त्यांच्यावर असणार आणि दुखर्या हाताविषयी त्यांना कोणाशी बोलताही येत नसावं म्हणून त्या थांबून बोलल्या असतील, माहित नाही ; पण तेव्हा मुंग्यांची रांग आठवली. त्या मुंग्या पटापट जातांना मध्येच एकमेकीना भेटतात काहीतरी कुजबुज करतात आणि परत पळू लागतात. माझ्या imagination चं मला हसू आलं आणि मग मीही परत पळू लागली पुढची मुंगी भेटेपर्यंत..
😁😃😀😂😂😂
ReplyDelete