WhatsApp वर हेल्थ टिप आली, वाचलं useful वाटलं म्हणून किती पटकन मी फाॅरवर्ड पण केला आणि पाच मिनिटांनी मी आठवण्याचा प्प्रयत्न केला पण त्यातलं मी काहीचं लक्षात नव्हतं ठेवलं.WhatsApp, Facebook,internet वर आपण सतत किती महत्वाच्या गोष्टी वाचतो, कोणासोबत बोलतांना किती गोष्टी आपण पटकन share करतो; पण खरचं त्यातल्या किती गोष्टींचा मी खर्या आयुष्यात अवलंबन करते.जसं की गेल्या ५ वर्षात मी १०० वेळा वाचलयं की दिवसातून किमान अर्धा तास चालावे, रोज आठ ग्लास पानी प्यावे; पण मी खरचं हे करत नाहींये आणि अशा अनेक गोष्टी आहे.ह्याचे परिणाम दुष्परिणाम मला माहीतीये, मी त्याविषयी अनेकदा वाचलयं तरीही मी ते करत नाहीयें कारण माझं माझ्याकडे असलेलं दुर्लक्ष.
आपण आपल्या शरिराला फार 'Taken for granted' घेतोय, नाहीं म्हटलं तरी एक अंधश्रद्धा निर्माण झालीये की मी काहीहि केलं तरी मला न विचारता , वयाची साठी होईपर्यंत माझं शरिर मला साथ देईलचं; पण आजुबाजुला पाहीलं तर लक्षात येइल की अता असं नाहीये, तो विश्वास आपणचं निर्माण नाही करु शकलोय. आज एक वेगळा दृष्टिकोन निर्माण करावासा वाटतोय तो म्हणजे आपलं आणि आपल्या शरिराचं एक नातं असावं, खुप जवळचं, इतर कोणापेक्षाही जवळचं कारण ह्याने जर साथ सोडली तर बाकिच्यांची साथ देण्याची इच्छा असेल तरी देता येणार नाही.
हे नातं फुलवायला हवं जशी आपण इतर नाती फुलवतो, ह्या नात्याच्या गरजा काय आहे, कशाने आनंद मिळेल आणि कशाने त्रास होइल हे आपणचं समजुन घेतलं पाहीजे, ह्या नात्यासाठी आवश्यक तो वेळ दिला पाहीजे; कारण हे नातं सुंदर असलचं पाहीजे.इतर नाती कदाचित आयुष्यभर टिकतील पण ह्या नात्याने आयुष्य टिकेलं.
हे युग Internet चं आहे ,Whatsapp , facebook वरची माहीती खरी असतेचं अस नाही;पण ती पडताळून पाहणं आणि योग्य माहीती मिळवणं आपल्या हातात आहे.त्या आधारे हे नवीन नातं मी तर जपणार आहे . तुम्ही पण ते जपावं कारण ही काळाची गरज आहे.
तुजं आहे तुझ्यापाशी आणि तुचं आहे तुझ्यासाठी
bhari.....
ReplyDelete