नवरा बायको नातं किती अजब आहे, म्हणायला सांगायला अगदी सोप्पं ; पण जेव्हा कोणाला सांगतो किंवा जेव्हा मनात येतं हा माझा नवरा तेंव्हा उठनारे तरंग खूप वेगळे आणि अवकाश व्यापून टाकणारे आहे. आयुष्यात अगदी लहानपणापासूनच आपण किती नाती निर्माण करतो तर कही निर्माण होतात ; पण ह्या सगळ्या नात्याना एकच बाजू असते त्याला एकच नव असत ; त्या नात्याचा आवका , मर्यादा ,अपेक्षा ह्या सगळ्यांना एक सीमा आहे.काही नात्यासाठी ठळक अधोरेखित केलेली तर काही नात्यासाठी अस्पष्ट होत गेलेली; पण ह्या सगळ्या पलिकडच नातं नवरा बायकोचे .
सुरवातीला जरी ह्याला अपेक्षाचं कोन्दण असतं तरी हळु हळु ते विरत जातं , मिसळत जातं , एकमेकांचे एकमेकांस न सांगता कळत जातं. हे नातं मैत्रिने सुरू व्हाव आणि त्या मैत्रीच्या बीजाच मोठं झाड व्हाव आयुष्य एकत्र जगताना.ह्या नात्यांत भांडण होणं अगदी साहजिकच आहे, कारण दोन वेगळ्या वातावरणात वाढलेले , दोन वेगळया जगातले हे दोन लोक जेव्हा एकत्र येतांत तर हे अगदी रास्त आहे. उलट ज्या दिवशी तुम्ही हक्काने भांडतात त्या दिवशी तुमचा एकमेकांवरचा विश्वास वाढलेला असतो की हे नातं आपले आहे , तो दिवस तुम्ही साजरा केला पाहिजे.
रोजच्या दिवसगणिक आपण नव्या आनंदाना , नव्या धक्क्याना, सुख दुःखाला सामोरे जातं असतो आणि ह्या सगळ्यांत आपण एकटे नाही ही भावनांच खूप उत्साह ,बळ देते.
हे सगळं मी अनुभवतेय,मी रोज शिकतेय. प्रत्येक दिवस आनंदचा आहे अस नाही किंवा प्रत्येक दिवस सुखाचा आहे असंही नाही ; पण ते तुज्या सोबतीचे आहे आणि कदाचित ह्यालाच पुर्ण होणं म्हणत असावे. ही छोटी कविता आपल्यासाठी.

दुर अगदी लाम्ब पलीकडे
कुठेतरी एक छोटे गांव असावे
कधीतरी आपण दोघेच
तिथे जाऊन बसावे
हाती असलेले थोडे ,निसटलेले थोडे
धागे आपण जुळवावे
कुठे हरलो , कुठे
जिंकलो
आपले आपणांस कळावे
हिशोब
सगळे मिटवुन
पाने
सगळे मिटून
मग आपले आपण हसावे
पुन्हा
नव्याने भेटून
पुन्हा
एकमेकांना ओळखून
असेच आपण
पुन्हा एकमेकांच्या प्रेमात
पडावे
No comments:
Post a Comment