Friday, 11 December 2015

पुस्तक


चित्रपटापेक्षाही जास्त आनंद ज्या गोष्टीमध्ये मिळतो  तो म्हणजे पुस्तक.
     पुस्तक वाचतांना आपण त्यातल्या पात्रांना आपल्या पद्धतीने रंगवतो , मनातल्या मनात त्याचं एक जग एक वेगळ विश्व निर्माण करतो. मी एखाद पुस्तक हाती घेतल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत मला चैनच पडत नाही, त्याकाळात मला स्वप्नात देखील मी पुस्तकात निर्माण केलेलं विश्वच दिसतं , त्या विश्वातल्या अनेक घडामोडी आणि मग पुढे काय होईल हे मी त्या स्वप्नातच बघते आणि मग खरंच काय होत हे वाचण्याची उत्कंठा अजून वाढते.
      पुस्तके आपल्याला सगळ्या प्रकाराचं ज्ञान देतात आपल्या विचारांना चांगली कलाटणी देतात.
मला सगळ्यात प्रथम विचार करायला लावणारी आणि माझ्यात आमुलाग्र बदल करणार पुस्तक म्हणजे विश्वास पाटील ह्यांची 'मृतुंजय ' हि कादंबरी. कदाचित वयात आल्यानंतर मी सर्वात प्रथम बालकथा आणि बालमित्र किंवा तत्सम पुस्तक सोडून वाचलेली पहिली कादंबरी हीच होती ; पण खरच त्या कादंबरीत कर्ण चं मांडलेल रूप , चारित्र्य हे खरच भावणार आहे आणि पटणार पण आहे. लेखकाने ज्या पद्धतीने हि कादंबरी मांडली आहे त्यामुळे आपण आधीच्या क्षणापर्यंत ज्याला वाईट समजत होतो त्या कार्णाविषयी आपल्याला एकदम सहानुभूती निर्माण होते. हे अशा प्रकारे मतपरिवर्तन करण्याची ताकद खूप कमी कादंबरी मध्ये आढळते. ह्या पुस्तकातून प्रत्येकाने वेगळा अर्थ घेतला असेल , वेगळी शिकवण घेतली असेल पण मी शिकली ते भक्कम व्हायला आणि एखाद्या गोष्टीवर,व्यक्तीवर निष्ठेने प्रेम करायला आणि सर्वात महत्वाची मला ह्या पुस्तकातून मिळालेली समज म्हणजे कोणत्याही  व्यक्तीला फक्त कृतीवरून तुम्ही कधीच चूक किंवा बरोबर ठरवू शकत नाही त्या मागचा  त्या व्यक्तीचा विचार हा सर्वात महत्वाचा ठरतो.
       त्यानंतर मला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक म्हणजे  'Not without my daughter' ह्या  पुस्तकातील   आईचं तिच्या मुलीवरच प्रेम , तिला वाचवण्यासाठी तिची धडपड आणि अन्यायाविरुध्ध स्त्री  कशा प्रकारे लढु शकते हे सांगणार हे पुस्तक. तिचा तो पुर्ण  प्रवास खरच एकदातरी अनुभवायला हवा पुस्तक संपल्यावर तुम्ही तिला सलाम केल्याशिवाय पुस्तक ठेवूच शकत नाही.
मी बरीच  पुस्तके वाचली आहेत अजून खूप वाचायची आहेत ; पण मी जेवढ वाचलंय त्यातून मला हे समजलंय कि पुस्तक हे माणसाला पूर्णत: बदलू शकतात  फक्त त्यात घुसून चालणाऱ्या घटना त्रयस्थपणे बघून तरीही त्यातील भावनांचा विचार करता आलं पाहिजे.
लोक जेव्हा म्हणतात हे पुस्तक वाईट ते पुस्तक चांगल हे मला पटत नाही त्यापेक्षा मला असा वाटत कि ' पुस्तक हे कधीच चांगल किंवा वाईट नसत , फरक एवढाच असतो कि त्यात मांडलेल्या गोष्टी आपल्याला पटतात किंवा पटत नाही'.

No comments:

Post a Comment