कधी कधी आपल्या माणसाशी आपण नकळत खूप वाद घालतो , रागात आपण खूप बोलतो आणि मग मन शांत झाल कि जाणवत, कि खरंतर चूक कोणाची नाहीये . आपला माणुस मात्र आपल्याला पुर्ण ओळखून असतो आणि म्हणूनच तो थांबतो आपण थांबायची वाट पाहत …
आज ह्या वळणावर आले क्षणभर थांबले,
काय घडले, काय चुकले पुन्हा
पुन्हा आठवले
तुझे ते वागणे अनपेक्षित मलाचं समजणे अवघड होते
आज थांबले, आज आठवले खरचं काय
तुझे चुकले होते
होतें ते दिवस सोनेरी सोबतीचें, मीचं होती तुझी, तुही होता माझा
न कळले मला, भान माझेचं हरपले
होते नव्हता रे तुझा गुन्हा
मागे वळून पाहीलें ,तु तिथेचं मी
परतण्याची वाट पाहात
चेहर्यावरती हसु तुझ्या डोळ्यात आसवांचा भास
प्रेम तुझे खरे का मीचं नाही समजु शकले,
असु दे म्हणत तुचं माझे डोळे पुसले
ह्या वळणावर ठरवले, कधी न होणार
वाट आपली वेगळी
मग असु दे ऊन वारा वा असो वाट वाकडी
No comments:
Post a Comment