Thursday, 8 August 2013

पाऊस

पाऊस हा दरवेळी एक नवीन कल्पना, भावना , विचार डोक्यात आणतो...
त्यातलीच एक साठवण अशीही...

"पाऊस तुझा माझा 
आपल्या आठवणीचा ठेवा जसा

आपला पहिला पाऊस कॉलेजचा 
निघुनही गेलो असतो; पण मुद्दाम अडकलो
पाऊस बघत एकमेकांच्या शब्दात भिजत राहिलो 

दुसऱ्या पाऊसानेही कॉलेजमध्येच अडकवले 
भांडून दूर चाललो होतो खरंच थांबावे लागले 
तेव्हढा वेळ आपलं भांडण मिटवायला पुरे होता 
त्यानंतर पाऊस सुध्धा आपल्या हास्यात सामील झाला होता 

त्यानंतर अनेक पावसाळे गेले 
आपण सोबत असतानाचे दिवस संपून गेले 
काही कडू आठवणींनी भिजलेले 
काही गोड मातीचा सुवास निर्माण करणारे 

त्यानंतरचा आजच हा बेभान पाऊस 
आजच्या ह्या पाऊसाने हे सगळे आठवून दिलें 
पुन्हा पाऊसालाच मी हे सगळे सांगितले 
मग मात्र मनात अश्रूंनी खूप गर्दी केली 
ती लपवण्या पुन्हा तुझ्या आठवणींसोबत 
मी चिंब भिजली…. "




No comments:

Post a Comment