Thursday, 14 January 2021

समुद्र

तुझ्यासारखचं आहे माझं मन
थांग पत्ता नसलेलं
वाहत आलेलं सगळचं 
इथे साचुन ठेवलेलं

कधीतरी येते मग 
एक अशीचं भरती
मनामधलं पाणी मग
येतं डोळ्यावरती


कधीतरी दाटून येते 
एक अनाहूत ओहोटी
शब्द सारे येऊनही
दाटून राहता मुखी

समुद्रा तुझ्यासारखचं 
आहे रे माझं मन
कितीही खोल असलं
तरी उथळपणे खळखळणारं

1 comment:

  1. वास्तवतेचं भान आणि हृदयापर्यंत पोहचनारी व्यथा ,रुदन आणि मन कल्लोळ कल्लोळ झालेले जीवनातिल अति महत्वाचे क्षण टीपलेले आहे,छान मँम खूपच मस्त

    ReplyDelete