Tuesday, 29 March 2016

सोबती

"पाहायचा कार्यक्रम डोंगरावर कोण ठेवतं ???"
"मी ठेवला ना "
"घरचे  ऐकले ???"
"त्यांना माहितीये त्यांची मुलगी तिला जे योग्य वाटेल तेच करते त्यामुळे ऐकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीचे "
"अरेय वाः ,  धोक्याची  घंटा "
"म्हणजे "
"म्हणजे जी मुलगी आई वडिलांचं ऐकत नाही ती नवऱ्याच काय ऐकणार "
"अच्छा  असं , मग सगळ्या घंटा  आत्ताचं  ऐकून घे म्हणजे नंतर कळल  असा होऊन पस्तावा करायला नको "
"मी एकदा निर्णय घेतला की  मागे वळून पाहात  नाही "
"म्हणजे  इतक्या लवकर तुझा निर्णय झाला??"
"असा मी कुठे म्हंटलं  मी in  general  सांगितलं , you  know  intro "
"Okay  trying  to  impress ??"
"Not  at  all , trying  to  express "
"Oh  , good  one  "

"थोडावेळ बसुया का ??"
"दमलास का इतक्या लगेचं "
"तसं नाही पण पोहचण्याची घाई नाहीये , इथे थोडावेळ थांबून इथला आनंद तर घेउचं  शकतो ना "
"पण आपण लवकर पोहचलो म्हणजे आपण पटकन मिळवल्याचा आनंद मिळेल  ना "
"लवकर पोहाचानारेही आपणंच  आहोत आणि उशिरा पोचाणारेही  आपणंच  ; मग कदाचित सगळ पटापट मिळवण्यात  हातात येणारे काही अनुभव निसटून जातील ; म्हणून  मला वर्तमानात जगायला आवडतं . पुढे काय होईल ह्याचा विचार करण्यात आत्ताचा आनंद का गमवायचा "
"मान्य पण म्हणून भविष्याचा विचारच नाही करायचा का,आला दिवस आनंदाने काढायचा अस केल तर भविष्य अंधारातच जाईल "
"तेव्हढा विश्वास स्वतःवर असला पाहिजे , कोणत्याही परिस्तिथित  चांगलाच पर्याय निवडण्याचा आणि तो निभावून नेण्याचा , चला आता मात्र चढलं  पाहिजे "
"हो नाहीतर उतरतांना  अंधारात याव लागेल "
"घाबरू नको मी अंधाराचा फायदा घेणार नाही "
"हो पण मी घेऊ शकते …. "

"एक विचारू ??"
"विचार ना "
"एका अनोळखी मुलाबरोबर एकटचं यायला भीती नाही वाटली "
"तसंही  तू काही अगदीच अनोळखी नाही मला आणि दुसरी गोष्ट मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि त्याप्रमाणे तयारी करून मगच आलीये" 
"सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे मी अचानक काय वागेल तुला काय माहित ना "
"हो पण तू in  general  कसा आहेस माहितीये मला आणि अगदीच वेगळा वागला तर त्यावर काय करायचं  ह्याची तयारी मी केलीये "
"तरीही तू risk  घेतालीयेस"
"तू काय मला घाबरवतोयेस , मी risk  घेतलीये  मान्य पण ती calculated  risk  घेतलीये  आणि तो विश्वास घरच्यांना आहे म्हणून त्यांनी मला येऊ दिल आणि तरी ते नाही म्हणाले असते तर मी नसती आली "
"अच्छा म्हणजे  नवर्याचं  ऐकशील तर "
"त्याने माझ्या risk  calculation  वर विश्वास ठेवला तर नक्कीच "
"अजूनही आशेचा किरण आहे "

"छान  वाटतंय न इथे किती , थंडगार वारा  आणि डोंगरचं  डोंगर , खूप चं वाटतंय "
" हो , मलाही आवडतं   फिरायला जायला , नवीन नवीन जागा बघायला , नवीन नवीन रस्ते शोधायला "
" नवीन नवीन गोष्टी करायला "
" हे चांगल सुचवलस तू ,इथे येण्याचा कार्यक्रम आवडला मला "
" हो , ते घरी सगळ्यांसमोर साडी घालून बसा  , सगळे आपल्यालाच बघताय आणि परत ते कांदे पोहे "
"तसही तुझ्या हाताचे कांदे पोहे खाण्यापेक्षा इथली कांदा भजी  नक्कीच चांगली असेल "
" मी चांगलाच स्वयंपाक करते आणि असाही तुला किती स्वयंपाक येतो??"
" पोटभर खाऊन दुसर्यालाही खाऊ घालू शकतो  एवढा नक्कीच येतो "
" गुड"
"women  empowerment "
"नवऱ्याला  स्वयंपाक येन किंवा त्याने करणं  हे काही  मुलींना women empowerment  वाटते ;पण मला नाही वाटत तसं "
" मंग तुला काय वाटत  "
" पुरुष काय करतो काय नाही ह्यापेक्षा एक स्त्री म्हणून इतर मदत न घेता  मी किती गोष्टी करते , किती गोष्टींमध्ये मी साक्षर आहे जसे कि बँकेचे व्यवहार , एखाद्या सहलीचं  नियोजन आणि अजून अशा कितीतरी  गोष्टी ते महत्वाचं आहे माझ्यासाठी "
"पण  म्हणजे स्त्री -पुरुष ह्यांनी कोणत्याही गोष्टीत एकमेकांवर अवलंबून राहू नये मग नवरा बायको नात्यामध्ये connectivity  कशी राहणार ??"
" मी म्हंटल ह्या सगळ्या गोष्टी करता यायला पाहिजे म्हणजे करायलाचं पाहिजे असा नाही "
"म्हणजे नवऱ्याला  रोज धुनी भांडी नाही करावी लागणार  "
"ते सांगता येत नाही "

"निघायला हवं आता "
"जायची इच्छा होत नाहीये "
"हो वातावरण छानचं आहे इथे खरंच "
"कदाचित दुसर काही कारण असू शकत "
"माहितीये मला "
"तुला कसं  कळल "
"तुझ्या डोळ्यात दिसतंय आणि मलाही तेचं  वाटतंय "
" बोल न मग "
" सगळ्या गोष्टी बोलून दाखवायची गरज आहे का ?? "
" त्याशिवाय कळणार कसं "
"बर मग लग्नानंतर कळसुबाईवर माझ्यासोबत मधुचंद्रला यायला तुला आवडेल का ?? "
"ईश्श्श " 
     
   







8 comments: