Sunday, 8 May 2016

मनाचे अंतरंग

समजत  नाही कधी कधी मनाला हव काय असतं 
फक्त रडत राहतं , ओरडत राहतं आणि मध्येचं  बसतं  शांत 
खरंच  समजत नाही मनाला कधी कधी काय हव असतं 


मैत्रिणीला फोन होतो, आईशी भरभरून बोलुन होतं 
नवऱ्याचंही डोक खाऊन होतं, तरीही मन रीतं राहत 
खरंच  समजत नाही मनाला कधी कधी काय हव असतं 


बाहेर भटकून होतं, टपरीवरचा चहा पिउन होतो 
स्वतःला खुश करण्यासाठी खरेदीही करून होते,
तरीही हे पुरत नाही 
खरंच  समजत नाही मना तुला काय हव असतं 


आवडीचा पदार्थ बनतो,
 त्याच्यासोबत जुना अल्बम बाहेर निघतो 
पोट भरतं खूप पण मन भरत नाही 
खरंच  समजत नाही मना तुला हव काय असतं 


मग अचानकचं  सर्व मूळ पदावर येतं ,
मनावरचं मळभ जाऊन ते बागडायला लागतं 
ह्या सर्वात मात्र एकच कळत नाही 
मनाला यातलं नक्की हवं तरी काय असतं 






3 comments: