मावशी मामी मध्ये मले सापडी मनी माय
आज्जी मनी जशी दुधावरली साय
मनं मामानं गाव, त्याने जीव लयी लाय
डोंगरमाथ्यावरूनी मोटार जाई फिरुनी
वाडा दिसे लांबूनच उभा मोटा डौलवानी
आमराई धुंडुनी, पारखभर राहू नदिमये डूबुनी
मनं मामानं गाव, त्याले जाऊ कशी विसरुनी
न्याहरिले एका ताटमा बसूत सहये भाऊबहिनी
कैऱ्या, आंबे, बोरे गुपचूप आणून देत वहिनी
ट्रॅक्टर, बैलगाडामा आमना मामा आणे फिरुनी
मनं मामानं गाव, त्याने दिल्या ह्या आठवणी
आप्पा, भाऊंची वाजे काठी, तशी सारे जाई पळुनी
मोठ्यास्ना धाक, लहानासन प्रेम सारं येई इथं जुळुनी
तिथं जावानी सर्वासले राही किती हौस
मनं मामानं गावं, तिथं प्रेमाचा पाऊस
शेतमंदी उंडारुनी जेव्हा दुखती आमचे पाय
गप्पा मारता मारता पाय दाबीतसे माय
कशावरण इथं कुणी उणे दुणे केले नाय
मनं मामानं गाव, त्याने जीव लयी लाय
khoop sundar !!
ReplyDeleteWah
ReplyDeleteChhan
ReplyDelete